ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच संभ्रमात टाकणारा एक फोटो सध्या सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या डोळ्यांना चमका देणारे फोटो याआधीही तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नुकताच एका कावळ्याचं आणि मांजरीचं इल्यूजन असलेला फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
हा फोटो रेडडिटवर उपलब्ध आहे. रॉबर्ट मॅगगुअऱ या व्यक्तीने हा फोटो ट्विट केला आहे. आता हा फोटो इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर वाऱ्यासारखा परसला आहे.
पहिल्या नजरेत हा फोटो पाहिल्यावर एका बाजूने तो कावळ्याचा फोटो असल्याचं दिसतं. पण बारकाईने लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की, हा फोटो कावळ्याचा नाहीये. हा फोटो एका काळ्या मांजरीचा आहे. ही मांजर फोटो क्लिक करताना ती वर बघत होती.
रॉबर्टचं हे ट्विट ३३ हजारपेक्षाही जास्त वेळा रिट्विट केलं गेलं आहे. तर २४ तासात या फोटोला १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. या फोटोवर आलेल्या अनेक गंमतीदार प्रतिक्रियाही तुम्ही बघू शकता.