Crow Viral Video : बालपणी सगळ्यांनीच एक कथा ऐकली असेल की, तहानलेल्या कावळ्याने कशाप्रकारे मडक्यात खडे टाकून पाणी वर आणलं आणि आपली तहान भागवली. पाणी खाली असतं, पण तिथपर्यंत त्याची चोच पुरत नाही. अशात तो मडक्यात खडे टाकून पाणी वर आणतो आणि पाणी पितो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो बघितल्यावर तुम्हालाही कळेल की, ही केवळ कथा नाही तर वास्तवातही असं होऊ शकतं. या व्हिडिओत एक कावळा पाण्यांच्या ट्यूबमध्ये काही दाणे टाकतो आणि पाणी वर आणतो. तो हे कसं करतो ते पाहण्यासारखं आहे.
इंस्टाग्राम अकाउंट @viralhog वर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले जातात. यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात कावळा प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये भरलेल्या पाण्यातून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. कावळ्याची हुशारी बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. कारण तो कथेत सांगितल्याप्रमाणे चोचेणे दाणे उचलत आहे आणि प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये टाकत आहे.
या व्हिडिओत तुम्ही बघू शकता काही प्लास्टिकच्या ट्यूबमध्ये अर्ध पाणी भरलं आहे. एका ट्यूबमध्ये कावळा दाणे टाकतो आणि त्यातील काहीतरी खाण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते त्याला खाता येत नाही. अशात तो खालचे दाणे ट्यूबमध्ये टाकायला सुरूवात करतो. एकापाणी एक बरेच दाणे तो ट्यूबमध्ये टाकतो. पाण्याची लेव्हल वाढते आणि त्यातील वस्तू वर येऊ लागते.
जशी त्यातील वस्तू वर येत कावळा ती खातो. नंतर एक व्यक्ती कावळ्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. कावळ्याच्या पायाला दोरी बांधली आहे. ज्यावरून हे दिसतं की, कावळा पाळलेला असावा. कदाचित त्याला असं करण्याचं ट्रेनिंगही दिलं गेलं असेल. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळत आहेत. तर लोक कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ बघून तुम्हालाही नक्कीच आनंद मिळाला असेल.