उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयातून मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका जिल्हाा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता उद्भवल्यानं एका गंभीर स्थितीतील रुग्ण महिलेला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे. आपल्या आईला जास्त त्रास होऊ नये. तसंच लवकर ऑक्सिजन मिळावा यासाठी या महिलेच्या दोन्ही मुली स्वतःच्या तोंडातन ऑक्सिजन देत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवर ताण आला असून सर्वत्र किती भयावह अवस्था आहे. हे या व्हायरल फोटोजच्या माध्यमातून दिसून येत आहे. फक्त याच रुग्णालयात नाही तर भारत भरातील अनेक रुग्णांलयातील रुग्ण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कठीण प्रसंगांचा सामना करत आहेत.
या फोटोतील महिलेला जेव्हा ऑक्सिजन कमी पडत होता. तेव्हा मुलींना आईच्या वेदना पाहावल्या गेल्या नाहीत. अशावेळी त्यांनी आपला जीव धोक्यात घालत त्यांनी ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न केला. या व्हायरल व्हिडीओजच्या माध्यमातून सध्याची आपातकालीन स्थिती दिसून येत आहे.
हॉस्पिटलमध्ये मिळाला नाही बेड; ऑटोत पतीला तोंडाने श्वास देत राहिली पत्नी
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशीच एक घटना तुफान व्हायरल झाली होती. एक महिला आपल्या पतीला घेऊन ऑटोने एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचली होती. तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. पत्नीने अनेकदा स्वत:च्या तोंडाने पतीला ऑक्सीजन देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ती पतीचा जीव (Men died without oxygen) वाचवू शकली नाही.
विकास सेक्टर सातमध्ये राहणारे ४७ वर्षीय रवि सिंघल यांची तब्येत बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे पत्नी रेणू सिंघल नातेवाईकांसोबत रवि यांना घेऊन श्रीराम हॉस्पिटल, साकेत हॉस्पिटल आणि केजी नर्सिंग होममध्ये गेली होती. बेड उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आलं नाही.
अखेर रेणू या ऑटोने आजारी पतीला एसएस मेडिकल कॉलेजमध्ये आणलं. रस्त्यात त्या पुन्हा पुन्हा पतीला स्वत:च्या तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न करत होत्या. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांनी रवि यांना तपासून मृत घोषित केलं. रेणू यांना यावर आधी विश्वास बसला नाही. पण त्यानंतर त्यांचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते.