Crystal Clear River In Meghalaya : पर्यटनाच्या दृष्टीने भारत एक मोठा पर्यटक देश आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. भारतातील अनेक सुंदर ठिकाणं बघण्यासाठी परदेशातूनही खूप लोक येतात. खासकरून नॉर्थ ईस्टमध्ये लोक जास्त फिरायला जातात. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून लोक खूश होतात. येथील शांत आणि स्वच्छ वातावरण सगळ्यांचं लक्ष वेधतं. मेघालयात एक अशी नदी आहे जी काचासारखी पारदर्शी आहे. ही नदी बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथे येतात. या सुंदर नदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत दिसत असलेल्या या नदीचं नाव उमनगोत आहे. तसेच या नदीला डौकी नदी नावानेही ओळखलं जातं. व्हिडीओत नदीवर चालत असलेली नाव भघून असंच वाटत आहे की, नाव एखाद्या काचावर चालत आहे. नदीचं पाणी इतकं स्वच्छ आहे की, तळातील दगड स्पष्ट दिसत आहे. नावेत बललेली महिला नदीच्या सौंदर्याचा आनंद घेत आहे.
ट्विटरवर हा व्हिडीओ @GoArunachal_ नावाच्या हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'तुम्ही भारतात कधी उडणारी नाव बघितली आहे का?'. या व्हिडीओला आतापर्यंत 5.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर 235K लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत.