घटना रशियातील Novonikolsk नावाच्या गावातील आहे. Dik असं या कुत्र्याचं नाव असून तो १८ वर्षांचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो त्याच्या पांघरुन झोपला होता. त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याला जागं करण्याचा प्रयत्नही केला गेला. पण तो काही उठला नाही. त्याचा श्वासही बंद झाला होता. त्यामुळे Dik चा मालक निराश झाला. रडू लागला. त्यानंतर आजूबाजूच्या काही लोकांना बोलवून त्याची प्रेतयात्रा काढण्यात आली आणि नंतर त्याला दफन करण्यात आलं. पण काही दिवसांनी तो घरी परत आला.
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, दफन केल्यावर काही वेळातच Dik शुद्धीवर आला असावा. शक्यता वर्तवली जात आहे की, तो बेशुद्ध होता. Dik कसातरी त्याच्या कबरेतून बाहेर निघाला. जवळच्या रस्त्यावर पोहोचला. तेव्हा त्याला काही लोकांनी शेल्टर होममध्ये नेऊन सोडलं. नंतर शेल्टर होमच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
(Image Credit : dailymail.co.uk)
शेल्टर होममधील कर्मचाऱ्यांना वाटत होतं की, त्याला नवीन घर मिळावं. कुणातरी त्याला दत्तक घ्यावं. अशातच Dik च्या मालकाने हा फोटो पाहिला तेव्हा त्यांना आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं. कारण Dik ला मृत म्हणूण दफन करण्यात आलं होतं. पण तो जिवंत होता.
शेल्टर होमचे हेड इरिना मुद्रोवा सांगतात की, 'Dik च्या मालकांना वाटलं की, तो मरण पावला आहे. पण तो झोपेत होता. शक्य आहे की, तो बेशुद्ध झाला असावा. चांगली बाब ही झाली की, त्याल दफन करण्यासाठी फार खोल खड्डा करण्यात आला नव्हता'.
(Image Credit : dailymail.co.uk)
Dik ला घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या दोन बहिणी जोरजोरात रडू लागल्या. हे आनंदाश्रू होते. कारण त्यांना त्यांचा प्रिय कुत्रा परत मिळाला होता. जाता जाता दोन्ही बहिणींनी शेल्टर होमला ५ हजार रुपये दान म्हणूण दिलेत.