अलिकडे लोकांमध्ये बाहेरील पॅकेट बंद पदार्थ खाण्याची क्रेझ चांगलीच वाढली आहे. रेडिमेड पदार्थ सर्रास खरेदी करुन खाल्ले जातात. पण यांच्या सुरक्षिततेवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहेत. कधी मॅगीच्या तर तर टोमॅटो सॉसमधून मेलेले झुरळ-किटक निघालेले बघायला मिळत आहेत. आता एका पुलाव पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळला आहे.
रिचर्ड लीच नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे की, 'मला प्रश्न पडलाय की, एका बंद पॅकेटमध्ये उंदीर गेला कसा? माझ्या पूर्ण घरात वास येतो आहे आणि माझ्या पत्नीला लागोपाठ उलट्या होत आहेत'. रिचर्डने त्या सुपरमार्केटलाही या पोस्टमध्ये टॅग केलंय.
आता या अशा घटना सतत समोर येत असल्याने नेमकं विश्वासाने खायचं काय? म्हणजे या घटनांमुळे लोकांचं बाहेर खाणं बंद झाल्याचं काही काळाने बघायला मिळालं तर नवल नको.