Deer Viral Video: देशाच्या वेगवेगळ्या भागात थंडीनं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी तापमान मायनस ५० पेक्षा कमी झालं. बर्फवृष्टीमुळे अनेक देशातील तापमान कमी झालं आहे. अनेक ठिकाणी वाहते-नदी नाले गोठले आहेत. तापमान इतकं कमी झालं आहे की, चालते-फिरते प्राणीही गोठत आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) होत आहेत. असाच एका व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एक हरिण बर्फाने गोठलं आहे आणि त्याला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली.
सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, भीषण बर्फवृष्टीमुळे आजूबाजूच्या भागात बर्फच बर्फ झाला आहे. व्हिडीओत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कजाकिस्तानमध्ये मायनस ५६ डिग्री तापमान झालं आहे. या तापमानात लोकांना फारच काळजीपूर्वक रहावं लागतं. रस्त्याच्या किनारी एक हरिण दिसलं जे बर्फामुळे गोठलं होतं. त्याला गोठलेलं पाहून स्थानिक थांबले आणि त्याच्या जवळ गेले. त्यामुळे हरणाने तेथून पळण्याचा प्रयत्न केला.
काही अंतर पळाल्यावर हरिण रस्त्यावर थांबलं आणि पुन्ह फ्रीज झालं. त्याला वाचवण्यासाठी काही लोकांनी मदत केली. स्थानिकांनी पुन्हा पुन्हा फ्रीज होत असलेल्या हरणाला पकडलं आणि त्याच्या अंगावरील बर्फ काढला. त्यावेळी हरिण जिवंत होतं. नंतर लोकांनी त्याला झोपवलं आणि उष्णता देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.