शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

कमाल! आधी 300 रुपयात जगायची; आता YouTube वरून लाखोंची कमाई, कोण आहे देहाती मॅडम?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 2:37 PM

आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ती गरिबीतून बाहेर आली आहे आणि आता सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त पैसे कमवत आहे.

सोशल मीडिया आता प्रत्येक गल्ली, शहर आणि गावागावात पोहोचला आहे. त्यामुळे अनेक लोकांमध्ये असलेले सुप्त गुण बाहेर येत असून त्यांना मोठं व्यासपीठ मिळत आहे. यशोदा लोधी हे उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील उत्तम उदाहरण आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ती गरिबीतून बाहेर आली आहे आणि आता सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त पैसे कमवत आहे.

यशोदा लोधी आज 'देहाती मॅडम' म्हणून ओळखली जाते. ती इंग्रजीची शिक्षिका असून उत्तर प्रदेशातील कौशांबी भागात तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे अनेकांना शिकवते. यशोदा लोधीला पाहिल्यावर ती किती साधी आहे याचा अंदाज येतो. पण ती बोलायला लागली की सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तिच्या YouTube चॅनेलवर, साधे व्हिडीओ शेअर करते आणि लोकांना इंग्रजी शिकवते. यशोदाने अनेकांना आपल्यासारखं इंग्रजी बोलायला शिकवलं आहे. 

यशोदा सर्वसामान्य घरात वाढली. ती तिच्या मामाच्या घरी लहानाची मोठी झाली, जिथे तिने 12वी पर्यंत हिंदीमध्ये शाळेत शिक्षण घेतले. यशोदा नंतर मुलांना शिकवू लागली. याच काळात ती तिच्या आयुष्याच्या जोडीदाराला भेटली, तिच्या नात्याला तिच्या कुटुंबाने पाठिंबा दिला नाही. यशोदाला तिच्या मामाने आणि आई-वडिलांनी घरातून हाकलून दिलं. मुलाच्या घरच्यांनीही हे लग्न मान्य केलं नाही. अशा प्रकारे यशोदा आणि तिचा पती वेगळे राहू लागले.

यशोदाचा पती आठवी पास होता, त्यामुळे तो रोजंदारी मजूर म्हणून काम करायचा. लग्नाच्या दोन वर्षानंतर 2019 मध्ये त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय ट्रॅक्टरखाली अडकला. तो आता कामावर जाऊ शकत नव्हता. अशाप्रकारे यशोदाने नोव्हेंबर 2021 मध्ये पहिला स्मार्टफोन विकत घेतला आणि प्रेरणादायी व्हिडीओ पाहून त्यावर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांच्या व्हिडीओद्वारे महिला घरबसल्या काम करून पैसे कसे कमावू शकतात यावरून तिला प्रेरणा मिळाली. 

यशोदाने तिचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आणि इतरांना इंग्रजी कसे शिकायचे आणि कसे बोलावे याचे मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अशा रीतीने अथक परिश्रमानंतर यशोदा ही देहाती मॅडम म्हणून ओळखली जाऊ लागली. एकेकाळी यशोदेला केवळ 300 रुपये घेऊन जगावे लागत होते. आता यशोदाचे YouTube वर 2.31 लाख सबस्क्रायबर आहेत आणि ती एका महिन्यात 80,000 ते 1 लाख रुपये कमावते जी खरोखरच खूप मोठी रक्कम आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलYouTubeयु ट्यूबenglishइंग्रजी