सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो फूटपाथवर अभ्यास करताना दिसत आहे. त्याच्यासमोर वह्या-पुस्तकं आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिल्लीतील असून तो लोकांच्या हृदयाला भिडला आहे. दिल्लीचा फोटोग्राफर हॅरीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर ही माहिती शेअर केली आहे. 16 फेब्रुवारीला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत 10 मिलियनहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे.
पवन असं या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलानं नाव आहे. तो हॅरीशी बोलतो. तो सहावीत शिकत असून. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमला नगरच्या बाजारपेठेत रबर बँड विकतो. जेव्हा मुलाला त्याच्या पालकांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितलं की त्याचे वडील कोलकाता येथे राहतात आणि त्याची आई घरी आहे. जेव्हा हॅरीने त्याला विचारले की तो घरी का अभ्यास करत नाही, तो फूटपाथवर का अभ्यास करतो? तर त्याने उत्तर दिले, 'मला घरी वेळ मिळत नाही.'
पवनने आपल्या कुटुंबाला दिलेला असा पाठिंबा पाहून लोक भावूक झाले. हॅरीने त्याला विचारूनच त्याचे बरेचसे फोटो क्लिक केले. यासोबतच त्याची स्टोरीही इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये हॅरीने लिहिलं की, "या लहान मुलाला कमला नगर मार्केटजवळ फूटपाथवर अभ्यास पाहिलं आणि विचारलं असता त्याने मला सांगितलं की तो त्याच्या कुटुंबाला सपोर्ट करत आहे, त्याचे वडील कोलकाता येथे राहतात. मला त्याचं डेडिकेशन आवडलं आणि मी त्याचे काही फोटो काढले."
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मी नशीबवान होतो की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी सर्वकाही केलं, गरीब असूनही, माझ्याकडे अभ्यासासाठी घर होतं, परंतु मला कधीही पैसे कमवण्यासाठी काहीही विकावं लागलं नाही असं म्हटलं तर दुसऱ्या युजरने मुलाला तू इतिहार रचणार आहेस असं म्हटलं आहे.