दिल्ली मेट्रो प्रवाशांना एक सुखद आणि सोयीस्कर प्रवास अनुभव देण्यासोबतच, मेट्रोमध्ये दररोज घडणाऱ्या घटनांचे व्हिडीओ आणि रील यामुळे देखील चर्चेत असते. याच दरम्यान, दोन मुलींमधील भांडणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि लोकही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोत दोन मुलींमध्ये वाद सुरू असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यामध्ये एक मुलगी उभी आहे, ती सीटवर बसलेल्या दुसऱ्या मुलीला म्हणते, ज्याला पाहिजे त्याला बोलव, असं सांगितल्यानंतर मुलीने तिला धक्काबुक्की केली. यानंतर दुसरी मुलगी उभ्या असलेल्या मुलीला मारहाण करू लागते. मग प्रत्युत्तरात पहिली मुलगीही दुसरीच्या कानशिलात लगावते.
"माझ्यावर हात उचललास... आता तू जेलमध्ये जाशील" असे म्हणत एक मुलगी दुसरीला खाली पडण्याचा प्रयत्न करते. त्यावर मुलगी म्हणते मी एक सिंगर आहे. मला मारशील, इतकं फोडेन ना तुला.... असं म्हणत अटक करण्याची धमकी देते. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
दिल्ली मेट्रोमध्ये बनवलेले अनेक व्हिडीओ समोर येत असतात, त्यातील काही खूप व्हायरल होतात, जे नंतर डीएमआरसीसाठी अडचणीचे कारण बनतात. लोकांना व्हिडिओ-रील न करण्याचे आवाहन करण्याबरोबरच, DMRC ने प्रवाशांना अशा गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. तसेच कारवाई देखील केली जाते.