Viral Video : रेल्वे स्थानक असो अथवा मेट्रो स्थानक संबंधित प्रशासनाकडून प्रवाशांना सुरक्षिततेबाबत वारंवार सूचना दिल्या जातात. या सूचना तुमच्यापैकी प्रत्येकाच्या कानावर पडल्या असतीलच. पण प्रवाशांकडून या नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे . दिल्ली मेट्रो स्थानकावर एक प्रवासी मेट्रोचे रुळ ओलांडताना मेट्रो आणि फलाटाच्या कचाट्यात सापडला. हा प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना अडकतो आणि समोर ट्रेन येते. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.या प्रवाशाला वाचविण्याकरिता फलाटावरील प्रवासी मदत करण्यासाठी पुढे सरसावले. एकंदरीत हा प्रवासी ज्या पद्धतीने अडकला आहे , त्यावरून तो गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर या प्रवाशाला तातडीने दिल्लीच्या एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रवाशाचा बेजाबदारपणा नडला :
हा व्हिडीओ साधारणत: १२ नोव्हेंबरला शेअर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चुकीच्या पद्धतीने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा अतताईपणा त्या प्रवाशाला चांगलाच भोवल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ बेजबाबदारपणे वागणाऱ्या प्रवाशांना मिळालेली चपराक आहे.
दिल्ली मेट्रो डीसीपींनी दिली माहिती :
दरम्यान, ही घटना दिल्लीत घडलेली नाही असा खुलासा दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे डीसीपी राम गोपाल नाईक यांनी दिली आहे. शिवाय त्यांना या व्हिडीओबाबत प्रसारमाध्यांकडून वारंवार विचारणा होत असल्याचे देखील ते म्हणाले. मेट्रो डीसीपी राम नाईक यांच्या म्हणण्यानूसार हा व्हिडीओ फार जुना आहे , किंवा इतर ठिकाणी ही घटना घडली असावी असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
येथे पाहा व्हिडीओ :