Social Viral :सोशल मीडियावरदिल्लीच्या रस्त्यावर फिरणाऱ्या 'स्पायडर-मॅन'चा व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय. व्हायरल व्हिडीओ पाहून हा सगळा प्रकार एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा काही कमी नाही, असं कोणालाही वाटेल.
दिल्लीच्या रस्त्यावर एक तरुण गाडीच्या बोनेटवर "स्पायडर- मॅन" सारखे कपडे घालून फिरताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांनी धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी त्याला तब्बल २६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दिल्लीतील द्वारका रस्त्यावर स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेला केवळ १९ वर्षीय तरुण आरामात कारच्या बोनेटवर बसून रील शूट करताना दिसतो आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ काढल्यामुळे इतरांनाही असे धोकादायक स्टंट करण्यासाठी प्रवृत्त केले जाऊ शकते, असे सांगत पोलिसांनी वाहनाच्या वर चढणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे यासह अनेक नियमांतर्गत त्याच्यावर दंड ठोठावला आहे. त्यामुळे तो आता पुन्हा असे व्हिडीओ काढणार नाही, असे नेटकरी म्हणत आहेत.
या व्हिडीओमध्ये स्पायडपमॅनचे कपडे घालूवन फिरणारा तरुण दिल्लीतील नजफगड येथील रहिवासी आहे. त्यासोबतच गाडी चालवणारा वाहन चालकाचे वय देखील १९ वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे.
या दोन्ही तरुणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा मालक तसेच वाहन चालक तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओची तक्रार केल्यामुळे या दोन्ही तरुणांवर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.