सध्या सोशल मीडियात एका व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून हा टिकटॉकचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याची जीप पेटवताना दिसतो आहे. काही लोक म्हणत आहेत की, या व्यक्तीने टिक-टॉक व्हिडीओसाठी त्याची जीप पेटवली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांनी जीप पेटवण्याचं खरं कारण सांगितलं.
हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर पोलिसांनी दोन लोकांना अटक केली. पोलिसांनुसार, जीप पेटवणाऱ्या व्यक्तीचं नाव इंद्रजीत जडेजा आहे. राजकोटमध्ये त्याचं ऑटोपार्ट्सचं एक दुकान काही पान टपऱ्या आहेत. त्याने ही गाडी कोठरिया फायर स्टेशनजवळ जाळली. आणि निमिश गोयल नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
पोलिसांनी माहिती दिली की, 'ज्या व्यक्तीची ही जीप होती, त्याला त्याच्या काही मित्रांनी गणपती घरी घेऊन जाण्यासाठी जीप मागितली होती. पण वेळेवर जीप सुरूच होत नव्हती. त्यामुळे जीप मालकाला वाईट वाटले. त्याला वाटले की, आपण मित्राची मागणी पूर्ण करू शकलो नाही आणि आता मित्रासमोर त्याचं क्रेडिट कमी होईल, म्हणून त्याने जीप पेटवली'.
पोलिसांनी पुढे सांगितले की, 'त्याने जीपवर पेट्रोल टाकले आणि गाडी पेटवून दिली. जीप त्याने राजकोटमधील फायर स्टेशनच्या समोर पेटवले'. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकाचा शोध सुरू आहे.