निसर्गाची करणी अन् नारळात पाणी... हे आपण अनेकदा ऐकलं, प्रत्यक्षात पाहिलंय अन् अनुभवलंयही. निसर्गाचा आपण जेवढा अभ्यास करून तेवढं आपण नवनवीन आश्चर्याचा उलगडा करत जाऊ. या निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अद्याप अनेकांना माहितही नाहीत. अशीच एक निसर्गाची अद्भुत कलाकृती आज आपण पाहणार आहोत. झाडं आपल्याला फळ, फुलं, सावली, ऑक्सिजन, औषधी देतात... हे आपलं सामान्य ज्ञान.. पण, तुम्ही कधी ऐकलंय का की झाडांनाही माणसांप्रमाणे गुदगुदल्या होतात?, धक्का बसला ना, पण हे खरं आहे.
वनअधिकारी सुरेंदर मेहरा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात त्यांनी कटनिया घाट येथील एका जंगलाची सफर करताना गुदगुदल्या होणारं झाड शोधलं आहे. त्यांच्या भटकंतीत किशन लाल या गाईडनं त्यांना हे झाड दाखवलं आहे आणि या व्हिडीओत खरंच या झाडाला गुदगुदल्या होत असल्याचे तुम्हीही पाहू शकता.
पाहा व्हिडीओ...