Digital Beggar Video : रस्त्यावर ठिकठिकाणी अनेकदा बरेच भिकारी त्यांच्या परिस्थितीमुळे भीक मागताना दिसतात. हे लोक समोर आले की, काही लोक मन मोकळं करत त्यांना काही पैसे देतात तर काही लोक सुटे पैसे नसल्याचं कारण देत त्यांना टाळतात. पण आता सुटे नसल्याचं कारण सांगणाऱ्या लोकांची सुटका नाही. कारण एका भीक मागणाऱ्या व्यक्तीने यावर उपाय काढला आहे. तो म्हणजे क्यूआर कोड. QR कोड घेऊन ही व्यक्ती लोकांना भीक मागताना दिसत आहे. त्याला बघून लोक डिजिटल भिकारी म्हणत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती आपल्या गळ्यात QR कोड लटकवून लोकांकडे जात आहे आणि भीक मागत आहे. लोकांनी सुटे नसल्याचं कारण देत टाळू नये म्हणून या व्यक्तीने हा जुगाड केला आहे. त्याच्याकडे फोन पे, पेटीएम आणि गूगल पे सर्विस आहे.
हा व्हिडीओ गुवाहाटीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. यात बघू शकता की, डोळ्यांना दृष्टी नसलेली व्यक्ती QR कोड घेऊन फिरत आहे. तो एका कारजवळ जातो आणि मदत मागतो. कारमधील व्यक्ती त्याला 10 रूपये देण्यासाठी QR कोड स्कॅन करतो. त्यानंतर ती व्यक्ती पैसे जमा झाल्याची सूचना ऐकण्यासाठी आपला फोन कानाजवळ धरतो. पैसे आल्याचं समजताच तो खूश होतो.
X वर हा व्हिडीओ कॉंग्रेस नेता गौरव सोमानी यांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिलं की, 'गुवाहाटीमध्ये एक अनोखा नजारा बघायला मिळाला. एक भिकारी PhonePe चा वापर करून लोकांना मदत मागत आहे. टेक्नॉलॉजीची खरंच काही सीमा नाही. यात सामाजिक-आर्थिक स्थितीच्या अडचणी पार करण्याची शक्ती आहे'.