संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा सगळ्याच सण उत्सवांवर कोरोनाचं सावट असलं तरी दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. काल दिवाळीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या होत्या सोशल मीडियावर सामाजिक, राजकिय, बॉलिवूड अशा सगळ्याच क्षेत्रातून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. दरम्यान जगभरातील लोक भारतातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसून येत आहेत.
श्रीलंका, अमेरिकासह इतर देशांच्या प्रमुखांनी भारताला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. फ्रान्सचे राजदूत इमॅन्यूएल लॅनेन यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेला एका व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आले. यानंतर मुंबई, कोलकाता, पाँडिचेरी, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये फ्रान्सच्या मिशन कार्यालयांच्या सदस्यांनी स्थानिक भाषांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स
याशिवाय चीनच्या राजदूतांनी भारतातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या शुभेच्छांच्या संदेशात स्वस्थ आणि समृद्ध जीवनाच्या सदिच्छा दिल्या आहेत. भारतात चीनचे राजदूत सुन वेइदोंग यांनी आपल्या ट्विटरवर शुभेच्छांच्या संदेशात लिहिलं आहे की, भारतातील मित्रांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आनंद आणि उत्साहाच्या या सणासाठी मी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांच्या चांगले स्वास्थ, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. कडक सॅल्यूट! विहिरीत पडलेल्या ७० वर्षांच्या आजीला वाचवण्यासाठी पोलिसानं मारली उडी अन्....