Viral Video : मोमोज खाणं आजकाल बऱ्याच लोकांना आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने मोमोज बाजारात मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी मोमोजची किंमतही वेगवेगळी असते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, मोमोज विकून किती कमाई केली जात असेल? याचाच खुलासा इन्फ्लुएन्सर सार्थक सचदेवाने केला आहे. एक दिवस रस्त्याच्या कडेला त्याने मोमोजचा स्टॉल लावण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने दिवसभराच्या कमाईचा खुलासा केला.
इन्स्टाग्रामवर शेअर या व्हिडिओला आतापर्यंत २.३ कोटी वेळा बघण्यात आलं आहे. सचदेवाने मोमोज विकणाऱ्याचा वेश धारण केला. तो हळूहळू गर्दीच्या ठिकाणी गेला. सगळ्यात आधी सार्थकने मोमोज बनवण्याचे बेसिक शिकले, त्यानंतर त्याला एकापाठी एक ऑर्डर आल्या.
सार्थकनुसार, त्याने स्टीम्ड मोमोज ६० रूपये प्लेट आणि तंदुरी मोमोज ८० रूपये प्लेटने विकले. व्हिडिओमध्ये त्याने सांगितलं की, पहिल्या ९० मिनिटांमध्ये साधारण ५५ प्लेट मोमोज विकले गेले होते. सायंकाळ झाली तर लाईन संपेना. नंतर चार तासांमध्ये त्याने साधारण १२१ प्लेट स्टीम्ड आणि ६० ते ७० प्लेट तंदुरी मोमोज विकले.
स्टॉलची कमाई आणि खर्चाबाबत समजून घेण्यासाठी सार्थक मालकासोबत बोलला. मालकानुसार, साधारण ६ हजार ते ७ हजार रूपयांच्या खर्चानंतर दिवसाची शुद्ध कमाई ७ हजार ५०० ते ८ हजार रूपये होते. सचदेवाने अंदाज लावला की,स्टॉल महिन्यातून साधारण २.४ लाख रूपये आणि वर्षाला साधारण ३० लाख रूपये कमाई करतो.
सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. मोमोजमधून होणाऱ्या कमाईबाबत वाचून लोक अवाक् झाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, "कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याऐवजी मी मोमोजचा स्टॉल लावायला पाहिजे होता. आज मला दिल्लीत भाड्याच्या घरात रहावं लागलं नसतं".