गेल्या २ महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशात कोरोनामुळे होत असलेल्या मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा वैद्यकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक घटना राजस्थानातील बिकानेरमधून समोर आली आहे.
एका रुग्णालयात भंवरसिंग चौहान नावाच्या ७० वर्षीय आजोबांना कोरोनामुळे मृत घोषित करण्यात आलं. मृत्यूनंतरची पुढची तयारीसुद्धा कुटुबांन सुरू केली होती. रुग्णालय प्रशासनाकडून कागदपत्र तयार करून रुग्णांच्या नातेवाईकांकडे मृतदेह सोपावला जाणार होता. त्याचवेळी अचानक या आजोबांनी श्वास घ्यायला सुरूवात केल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
दुसरीकडे वडीलांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर मुलगी धावतच रुग्णालयात पोहोचली. वडील आपल्यात राहिलेले नाहीत याचा विचार करून मुलीला खूप रडू कोसळत होतं. जवळपास दीड- दोन तास लेक रडत राहिली. त्यानंतर अचानक भंवरसिंग चौहान यांच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. त्यांना श्वास घेता येऊ लागला. त्यानंतर उपस्थितांनी त्वरित याबाबत डॉक्टरांना माहिती दिली. आपले वडील जीवंत असल्याचं कळताच लेकीला आनंद झाला.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
आता जीवंत व्यक्तीला मृत घोषित का करण्यात आलं? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 4 मे रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान शनिवारी दुपारी त्यांच्या ऑक्सिजन पातळीत घट झाली आणि तब्येत जास्त बिघडली. यानंतर डॉक्टरांनी ईसीजी काढून ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं. एका तासानंतर डॉक्टरांनी भंवरसिंग यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांची चौकशी केली जाईल, असं आश्वासन औषध विभागाचे अध्यक्ष डॉ. बी. के. गुप्ता यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिलं आहे.