कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. पण रोज चष्मा वापरत असलेल्या लोकांना मास्कच्या वापरामुळे त्रासाचा सामना करावा लागत आहे. नेहमीच मास्क लावल्यानंतर चष्याच्या लेन्सवर फॉग जमा होते. त्यामुळे चष्म्यातून व्यवस्थित दिसत नाही. तुम्हाला किंवा तुमच्या कुटूंबातील व्यक्तींना, मित्र मैत्रीणींना या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज आम्ही तुम्हाला डॉक्टरांनी केलेला एक भन्नाट जुगाड दाखवणार आहोत. डॉक्टरांनी या समस्येवर एक सोपा उपाय शोधून काढला आहे. यामुळे चष्म्याच्या लेन्सवर फॉग जमा होणार नाही. सोशल मीडियावर ही ट्रिक खूप व्हायरल होत आहे.
@DanHeifermanMD या ट्विटर युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मास्क लावल्यानंतर तुम्ही जर चष्म्याच्या समस्येचा सामना करत असाल तर एक छोटंस बँडेएड तुमची मदत करू शकतं. फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही मास्कच्या मधोमध नाकाला बँडेएड लावू शकता.
सॅल्यूट! पत्नी अन् मुलीच्या आठवणीत गेल्या १० वर्षांपासून मोफत अन्न पुरवतोय 'हा' देवमाणूस
यामुळे नाका तोंडातून येणारी गरम वाफ चष्म्यापर्यंत जाणार नाही. त्यामुळे फॉगही जमा होणार नाही. याशिवाय तुम्हाला कोणतीही वस्तू पाहताना सतत चष्मा पूसून घ्यावा लागणार नाही. आतापर्यंत या फोटोला एक लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून ६४ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. अनेकांनी डॉक्टरांच्या या ट्रिकचे कौतुक केले आहे. मातीने भरलेला ट्रक खाली करताच पडले सोन्याचे शिक्के; अन् लोकांना कळताच घडलं असं काही...