कोरोना व्हायरसचा कहर देशभरात कायम आहे. आपल्या देशातील बर्याच राज्यांत कोरोना पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला असून रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांचीही संख्या वाढत आहे. यादरम्यान, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हे पाहून आपणही भावनिक व्हाल. या कठीण परिस्थितीत प्रत्येकवेळी तुमच्यासमवेत उभे असलेले कोरोना वॉरियर्स आणि डॉक्टरांचेही हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''केवळ उपचार हाच नाही तर कौटुंबिक प्रेमही आमचे कोरोना वॅरियर्स लोकांना वाटत आहेत. गिर सोमनाथ जिल्ह्यातील आरोग्य सेवकाचा हा व्हिडिओ मनाला भिडणारा आहे. वैद्यकीय पथक अत्यंत तणावग्रस्त वातावरणात माणसांची सेवा करीत आहे. त्यामुळे घरी रहा, कोरोना केसेस वाढू न देता मदत करा. "
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कोरोना पीडित महिला रुग्णालयाच्या पलंगावर बसली आहे, तर पीपीई किट परिधान करणारी एक आरोग्य कर्मचारी समोर उभी आहे, जी त्या महिलेला व्यायाम कसे करावे हे शिकवत आहे. ती महिलासुद्धा पाहून व्यायाम करत आहेत. काही वेळानंतर, ती आरोग्य कर्मचारी महिलेचे केस बांधण्यास सुरवात करते.
एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!
हा व्हिडिओ पाहून आपल्याला हे देखील समजेल की आरोग्य कर्मचारी लोकांची काळजी घेण्यात कसे गुंतले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 22 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर लोक या आरोग्य कर्मचाऱ्याचे खूप कौतुक करत आहेत.