गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं हाहाकार पसरवला आहे. भारतात कोरोना रुग्णांचा आकडा १३ लाखांवर गेला आहे. आरोग्यसेवेतील कर्मचारी दिवसरात्र मेहनत करून कोरोना रुग्णाचे उपचार करत आहेत. रोजची वाढती आकडेवारी पाहता डॉक्टरांवर आणि इतर वैद्यकिय व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. रुग्णांचा जीव वाचवणं हे खूपच आवाहानात्मक ठरत आहे. सध्या सोशल मीडियावर रात्रंदिवस रुग्णांना वाचवण्यासाठी झटत असलेल्या एका डॉक्टरच्या हातांचा फोटो व्हायरल झाला आहे.
पीपीई काढल्यानंतर एका डॉक्टरच्या हातांची झालेली अवस्था पाहून मन सुन्न होतं. कोरोनातून बाहेर येत असलेल्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टरांची मेहनत सगळ्यांच्याच लक्षात येईल. एका डॉक्टरनं पीपीई कीट काढल्यानंतर आपल्या हातांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाआहे. डॉक्टर सहिद फैजान अहमद यांनी हा फोटो शेअर केला आहे.
घामामुळे हातांची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला खूप प्रतिसाद दिला आहे. या फोटोला आतापर्यंत १७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये जास्त वेळ काम केल्याप्रमाणे थकलेले, ओले हात दिसत आहेत. याआधीही सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला होता. फ्रंटलाईन हिरोजना सलाम असं नेटकरी म्हणाले आहेत.
हे पण वाचा-
हृदयद्रावक! काम करायला नकार दिल्यानं ८२ वर्षीय सासूला मारहाण; सुनेनं घराबाहेर हाकललं
या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज
बाबो! खोदकामात मजुराला सापडला ४४२ कॅरेटचा हिरा, किंमत वाचून व्हाल अवाक्...