काही वेळा कुत्रे इतरांना अडचणीत पाहून मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा एका मेंढीला (Sheep) अडचणीत मदत करताना दिसत आहे. मात्र, मेंढीला मदत करण्यासाठी कुत्रा ज्या पद्धतीचा अवलंब करतो ते पाहून तुम्हाला नक्कीच हसायला येईल.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की झाडाच्या फांदीमध्ये एक मेंढी अडकली आहे आणि एक कुत्रा तिच्या मदतीला येतो. मेंढीला तिथून बाहेर काढण्यासाठी, कुत्रा प्रथम तिला पुढे ढकलतो, परंतु जेव्हा तो त्यात अपयशी ठरतो, तेव्हा तो एक मजेदार युक्ती वापरतो. तो पलीकडून येतो आणि मेंढीला गुदगुल्या करू लागतो, त्यामुळे मेंढी उडी मारते आणि त्यामुळे तीही संकटातून बाहेर पडते आणि घाईघाईत तिथून पळून जाते.
हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर koyun_kangal नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ४.२ मिलियन म्हणजेच ४२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर ५८ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मेंढ्यांना यशस्वीरित्या वाचवल्याबद्दल लोकांनी कुत्र्याचे कौतुक केले आणि त्याचवेळी, त्याने वापरलेल्या युक्तीवर हसले.