वाळूच्या ढिगाऱ्यावर तुम्ही अनेकदा उडी घेतली असेल...तो अनुभव कसा असतो हे तुम्हाला माहीत असेलच. पण सध्या झाडाच्या पानांच्या ढिगाऱ्यावर उडी घेणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नुसता व्हायरलच झाला नाही तर 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिला सुद्धा.
जर तुम्ही थकले असाल, कंटाळा असेल तर तुम्हाला केवळ 2 मिनिटांचा हा व्हिडीओ आराम मिळवून देऊ शकतो. कारण हा व्हिडीओ तुम्ही एकदा नाही तर पुन्हा पुन्हा बघाल आणि हेच म्हणाल की, या कुत्र्याच्या जागी तुम्ही असायला हवे होते.
@chayahyunxx या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ 12 मार्चला शेअऱ केला होता. त्यानंतर अनेक लोकांनी हे ट्विट रिट्विट केलं. 90 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला, 35 हजारपेक्षा जास्त लाइक्स याला मिळाले आणि 15.5 मिलियन व्ह्यू याला मिळाले. लोक या कुत्र्याचे फॅन झाले आहेत.
या व्हिडीओची सुरूवात एका कारपासून होते. म्हणजे एक महिला कारची डिक्की उघडते आणि त्यातून एक कुत्रा धावत सुटतो अन् थेट पानांच्या ढिगाऱ्यावर उडी मारतो. हा व्हिडीओ पाहताना हे लगेच लक्षात येतं की, असं करायला कुत्र्याला फारच आवडतं.