शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

बॉल पकडण्यासाठी कुत्र्याने हवेत उंचावर घेतली उडी, व्हिडिओ पाहुन नेटिझन्स झाले चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 4:47 PM

हवेत फेकलेला चेंडू हवेतच पकडण्यासाठी कुत्र्याने मारलेली उडी (Dog high jump) पाहून लाखो नेटिझन्स चकित झाले आहेत.

आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सगळ्यात समजूतदार पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. कित्येक वेळा कुत्रं अशी काही कामगिरी करून दाखवतं, ज्यामुळे हीच गोष्ट वारंवार सिद्धही होते. कुत्र्यांना योग्य ट्रेनिंग न देताही ते माणसांना मदत करतात. ट्रेनिंग दिल्यानंतर तर अगदी बॉम्ब शोधण्यापासून सर्व कामं ती करू शकतात. यामुळेच ट्रेनिंगसाठी (Trained Dogs) इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्र्यांची निवड केली जाते. इंटरनेटवर कुत्र्यांच्या कित्येक कारनाम्यांचे व्हिडिओ (Dog training Videos) दररोज अपलोड होत असतात.

Malinois.gram या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनदेखील वाईल्डलाईफ व्हायरल या सीरीजमध्ये असेच आश्चर्यकारक व्हिडिओ (Viral Dog videos) शेअर केले जातात. सध्या यापैकी एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओतील कुत्र्याने एवढी उंच उडी (Dog high jump video) मारली आहे, की ते पाहून मोठमोठे हाय-जम्प खेळाडूही लाजतील. हवेत फेकलेला चेंडू हवेतच पकडण्यासाठी कुत्र्याने मारलेली उडी (Dog high jump) पाहून लाखो नेटिझन्स चकित झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या हातातील बॉल हवेत उंच फेकते. तर, दुसरी व्यक्ती खाली वाकून उभी आहे. व्हिडिओचा स्टार असलेला कुत्रा धावत येऊन वाकलेल्या व्यक्तीच्या पाठीचा आधार घेत हवेत उंच (Dog Jumps to catch ball) उसळी घेतो; आणि हवेतला बॉल तोंडात पकडून खाली येतो. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, आणि हजारोंच्या संख्येने लोक यावर कमेंट्स आणि शेअर करत आहेत.

या कुत्र्याला अशा प्रकारे उडी मारण्याचं ट्रेनिंग दिलं गेलं आहे, हे तर व्हिडिओ पाहूनच तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओमध्ये असणाऱ्या दोन व्यक्ती त्याचे ट्रेनर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अर्थात, या कुत्र्याच्या कामगिरीचं श्रेय पूर्णपणे त्याच्या ट्रेनिंगला (Trained Dog videos) नाही, तर त्याच्या मेहनतीलाही जातं. कारण केवळ प्रशिक्षणामुळे एखादी गोष्ट साध्य होणं शक्य नाही, सोबतच कुत्र्यानेदेखील भरपूर मेहनत घेणं गरजेचं आहे. हीच मेहनत या कुत्र्याने घेतल्याचं या व्हिडिओत दिसून येतं.

इंटरनेटवर हा व्हिडिओ भरपूर व्हायरल (Viral dog video) होत आहे. हाय जम्प करणाऱ्या या कुत्र्याला पाहून त्याचं कौतुक करत आहेत. सोबतच त्याच्यासाठी काळजीही व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये हा कुत्रा खाली गवतात उतरताना दिसतोय. तर, त्याऐवजी खाली गादी किंवा मॅट ठेवण्याचा सल्ला लोक कमेंट्समध्ये देत आहेत. आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांमध्ये सगळ्यात समजूतदार पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याची ओळख आहे. कित्येक वेळा कुत्रं अशी काही कामगिरी करून दाखवतं, ज्यामुळे हीच गोष्ट वारंवार सिद्धही होते. कुत्र्यांना योग्य ट्रेनिंग न देताही ते माणसांना मदत करतात. ट्रेनिंग दिल्यानंतर तर अगदी बॉम्ब शोधण्यापासून सर्व कामं ती करू शकतात. यामुळेच ट्रेनिंगसाठी (Trained Dogs) इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कुत्र्यांची निवड केली जाते. इंटरनेटवर कुत्र्यांच्या कित्येक कारनाम्यांचे व्हिडिओ (Dog training Videos) दररोज अपलोड होत असतात.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम