जो मारणाऱ्यापासून वाचवतो त्यालाच देव म्हणतात. काही लोक प्राण्यांना (Animals) मरायला सोडतात, पण काही लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे येतात. भटक्या कुत्र्यांना (dogs)त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींना स्वतःहून सामोरं जावं लागतं, कारण त्यांची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा त्यांचा कोणीही मालक नसतो. दरम्यान असे काही लोक आहेत ज्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे. एका व्यक्तीने आपला जीव धोक्यात घालून एका कुत्र्याचा जीव कसा वाचवला याचे जीवंत उदाहरण तुम्हाला दाखवत आहोत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कुत्रा पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाताना दिसतोय. त्यावेळी एका माणसाने जीव धोक्यात घालून त्याला वाचवल्याचं दिसत आहे. एका मोठ्या नाल्याच्या वेगानं वाहणाऱ्या पाण्यात कुत्रा लांबून वाहत येत होता, त्याला पाहून एका व्यक्तीनं जेसीबीची मदत घेतली. जेसीबीच्या कॅचरवर बसून तो वेगाने वाहणाऱ्या नाल्याजवळ गेला. कुत्रा त्याच्या जवळ येताच योग्य वेळी त्याला पकडून वर खेचलं.
कुत्र्याचा जीव वाचवल्यानंतर त्याने त्याला आपल्या कुशीत घेतले आणि नंतर बाहेर आणून सोडलं. ३० सेकंदांचा हा व्हिडिओ १.२ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. @GoodNewsCorres1 या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'इक्वाडोरमधील कॅनॉलमध्ये बांधकाम कामगार कुत्र्याला पाण्यातून बाहेर काढत आहे.' या व्हिडिओला आतापर्यंत 38 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे, तर 5600 हून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे.