ठाणे -" मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी रोजी पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसू नका " असे जे सांगितले जात आहे त्यात काहीही तथ्य नाही. असे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले.
या विषयी बोलताना दा.कृ.सोमण म्हणाले की दरवर्षी मकर संक्रांतीला अशा प्रकारच्या काहीतरी अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नये. मकर संक्रांतीच्या वेळी थंडीचे दिवस असतात. काळ्या रंगाची वस्त्रे शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र नेसण्याची प्रथा आहे. मकर सक्रांतीच्या दिवशी पिवळा रंगाचे वस्त्रे घालू नका, पिवळा रंग वर्ज्य करावा लागेल असे मेसेज आणि रिल्स सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यावर सोमण यांनी मत मांडले.