प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडिअन सुनील ग्रोवरने त्याच्या इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात कार दिसतेय जी शोरूममधून बाहेर येत आहे आणि ड्रायव्हरने थेट समोरच्या भींतीवर नेऊन धडकवली. सुनीलने या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'नवीन कार थेट शोरूममधून सर्व्हिस स्टेशन'. हा व्हिडीओ जुना आहे. जून महिन्यात यूट्यूबवर शेअर अपलोड करण्यात आला होता.
झालं असं की, या कारमध्ये जो ड्रायव्हर बसला होता त्याला ऑटोमॅटिक कार चालवता येत नव्हती. रिव्हर्स गिअर टाकण्याऐवजी तो कार थेट वेगाने भिंतीवर घेऊन गेला आणि नव्या कारचा अपघात झाला. (बोंबला! व्हिडीओ बनवता बनवता ठोकली वडिलांची २५ कोटींची कार, मग सांगितलं कारण...)
ज्या कारचा अपघात झाला ती Kia Carnival Minivan आहे. ही एक लक्झरी कार आहे. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट केली की, ड्रायव्हर कदाचित चेक करत असेल तर एअरबॅग उघडतात की नाही. तर एका दुसऱ्या यूजरने लिहिले की, असं तुम्ही चेक करू शकता कार सेफ आहे की नाही.
नवीन पोर्शे कार ठोकली
दरम्यान, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. Andy नावाच्या यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. टाइम्स ऑफ इंडियानुसार, Manninggtree, Essex यूकेचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत पोर्शे कार हळूहळू पुढे जात आहे. कार पूर्णपणे नवीन दिसत आहे. अचानक कार वेगाने पुढे जाते आणि थेट समोर उभी असलेल्या ब्लॅक एसयूव्हीवर जाऊन आदळते. त्यानंतर भिंतीच्या खाली पार्क असलेल्या कारवर जाऊन आदळते.