अनेक वेळा दारूच्या नशेत लोक असे कृत्त करताना दिसतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवरही शरमेने मान खाली घालण्याची वेळ येते. एवढेच नाही, तर काही वेळा दारू पिणारे लोक स्वतःसाठीच संकट उभे करून घेतानाही दिसतात. असाच काहीसा प्रकार आता झारखंडमधील गढवा येथून समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
येथे एका व्यक्तीला दारूच्या नशेत अजगर गळ्यात टाकणे चांगलेच महागात पडले. हा अजगर जेव्हा गळा अवळू लागला, तेव्हा या व्यक्तीने आरडा-ओरड करायला सुरुवात केली. हे एकूण या व्यक्तीचा 14 वर्षांचा मुलगा मदतीसाठी धावला आणि त्याने 15 ते 20 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आपल्या वडिलांची अजगराच्या तावडीतून सुटका केली. ही घटना झारखंडच्या गढवामधील कितासोती खुर्द या गावातील आहे. 55 वर्षीय बिरजालाल भुइया गावाजवळील एका कालव्यात मुलासोबत मासे पकडण्यासाठी गेला होता. याच वेळी ही घटना घडली.
गावातील लोक हरले, तरी मुलगा प्रयत्न करतच होता -गावातील लोकांनी अजगराच्या तावडीतून बिरजालालची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यांना बिरजालालचा 14 वर्षीय मुलगा नितीशला आवाज दिला. यानंतर, नितीश धावत आला आणि अजगराच्या तावडीतून आपल्या वडिलांना सोडविण्याचा प्रयत्न करू लागला. तो अजगर पकडून खेचू लागला. याच वेळी बिरजालाल पाण्यात पडला. यामुळे अजगराची पकड ढिली झाली आणि नितीशला वडिलांच्या गळ्यातून अजगर काढण्यात यश आले.
वन विभागाने बिरजालाललाच धरले जबाबदार - या घटनेत बिरजालालला थोडी दुखापतही झाली आहे. तो गावातच उपचार घेत आहे. हा अजगर मंगळवारळी रात्रीच्या सुमारास गावात दिसून आला होता. तेव्हा त्याला पकडून कालव्याच्या किनाऱ्यावर सोडण्यात आले होते. या घटनेनंतर आता, गावातील लोकांनी या अजगराला जंगलात सोडले आहे.