काही दिवसांपूर्वी थायलॅंडच्या एका व्यापाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. Anont Rotthong असं या व्यापाऱ्याचं नाव असून तो त्याच्या मुलीच्या लग्नासाठी एका मुलाच्या शोधात आहे. यासाठी त्याने एका टुर्नामेंटची घोषणा केली होती. याबाबत त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. तसेच त्याने जावयाला २ कोटी रूपये देणार असल्याची घोषणाही केली होती. मग काय त्याची ही फेसबुक पाहून १० हजार मुलांनी अर्ज केले.
Anont Rotthong ने मुलीच्या होणाऱ्या पतीला कॅशसोबतच १ घर आणि १० गाड्या आणि डूरियन फळांचे दोन बाजार देण्यार असल्याची घोषणा केली होती. भावी जावयासाठी त्याने काही अटीही ठेवल्या होत्या.
१) मुलगा चांगला आणि जुगार खेळणारा नसावा.
२) मुलगा मेहनती असावा.
३) पैसांचा वापर त्याला करता यायला हवा.
४) डूरियन फळाबाबत आणि व्यवसायाबाबत त्याला सर्व माहिती असावी.
पण झालं असं की, Anont ची ही पोस्ट त्याच्यासाठी डोकेदुखीचं कारण ठरली आहे. कारण ही पोस्ट वाचून साधारण १० हजार मुलांनी ऑफर आले होते. ही मुलं पुन्हा पुन्हा त्यांना फोन करून टुर्नामेंटबाबत विचारू लागले होते. याला वैतागून त्यानी ही टुर्नामेंटच रद्द केली. दरम्यान, मुलीसोबत लग्नासाठी एका २८ वर्षीय तरूणाने अर्ज केला होता. Premyosapon Khongsai असं त्याचं नाव असून तो सुद्धा डूरियन फळांचं व्यवसाय करतो.
Premyosapon ने फेसबुकवर त्याचा फोटो टाकून लिहिले की, 'मी तुमच्या मुलीशी लग्न करण्यासाठी इच्छुक आहे. आमचा सुद्धा Durian फळांचा व्यापार आहे. साधारण ३०० झाडं आहेत आमची. मी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या झाडांची काळजी घेतो. मला ट्रॅक्टर सुद्धा चालवता येतो. माझा विचार करण्यात यावा'.
मात्र, मुलीच्या वडिलांनी म्हणजेच Anont Rotthong यांनी या मुलाचं प्रपोजल रिजेक्ट केलं. कारण काय तर म्हणे मुलगा फार जास्त हॅन्डसम आहे. आणि कदाचित भविष्यात तो त्याच्या मुलीला दगाही देऊ शकेल.
दरम्यान Anont Rotthong याने मुलीच्या लग्नासाठी आयोजित केलेली टुर्नामेंट रद्द केली आहे.