Viral Video : अंतराळाबाबत लोक नेहमीच उत्सुक असतात. त्यांना अंतराळात नेमकं काय होतं, कसं होतं हे माहीत करून घ्यायचं असतं. अंतराळाबाबत अलिकडे वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येत असते. एक असा काळ होता जेव्हा पृथ्वीबाबत लोकांना काहीच माहीत नव्हतं. पण आता टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे की, अंतराळातून पृथ्वी बघता येते. चंद्रावरूनही पृथ्वीचा नजारा बघता येऊ शकतो.
तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये पृथ्वी निळ्या आणि पांढऱ्या रंगात चमकताना बघितली असेल. आपण सायंकाळी सूर्य मावळताना बघतो आणि चंद्र उगवताना बघतो. आज असाच एक पृथ्वीचा वेगळा नजारा आम्ही दाखवणार आहोत. जो जपानी स्पेसक्राफ्ट Kaguya ने रेकॉर्ड केला आहे.
चंद्रावरून पृथ्वीचा नजारा....
अंतराळातून रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडीओत तुम्ही चंद्राचा पृष्ठभाग बघू शकता. यावरून तुम्हाला निळ्या रंगाची पृथ्वी दिसू शकते. हळूहळू ती वर येत आहे. अशात पृथ्वीवर कॅमेरा झूम होतो आणि चंद्र फिरत असतो. हे सगळ्यांनाच माहीत आहे की, चंद्र पृथ्वीच्या फेऱ्या मारतो. पण हा व्हिडीओ बघण फारच रोमांचक आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर @wonderofscience नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.