सध्या एका कंपनीत कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. परंतु कर्मचाऱ्यांना या ठिकाणी पॉर्न व्हिडीओज पाहून त्याचा रिव्ह्यू करावा लागणार आहे. केवळ दोन दिवसांच्याच आत या नोकरीसाठी ३१ हजार लोकांनी अर्ज केला आहे. परंतु काम करण्यासाठी कंपनीच्या काही अटी शर्थीही आहेत. Bedbible असं या कंपनीचं नाव असून ती अडल्ट प्रोडक्टचे रिव्ह्यू उपलब्ध करून देते.
'द सन'च्या रिपोर्टनुसार अमेरिकन कंपनी Bedbible नं ज्या पदांवर नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत, त्या पदावर निवड होणाऱ्या कर्मचाऱ्याला पॉर्न व्हिडीओचा रिव्ह्यू करावा लागणार आहे. तसंच Bedbible ही कंपनी संबंधित व्यक्तीच्या सातत्यानं संपर्कातही राहणार आहे.
दरम्यान, यामध्ये व्हिडीओचा कालावधी, मेल फिमेल रेश्यो, कोणती भाषा, असा सर्व डेटा एकत्र करून एक रिपोर्ट तयार करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी कर्मचाऱ्यांना तासाला जवळपास १५०० रुपये देण्यात येणार आहे. तर ५० तासांच्या व्हिडीओचे रिव्ह्यू केल्यास त्यांना ७५ हजार रुपये मिळतील. ज्या व्यक्तीचं वय २१ वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना यासाठी अर्ज करता येईल. ही नोकरी कोणत्याही ठिकाणाहून करता येणार असून जगातील कोणतीही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते. "ही अब्जावधी डॉलर्सची इंडस्ट्री आहे आणि आमच्या रिसर्चमधून अनेक नव्या गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया Bedbible च्या हेड कॉन्टेंट क्रिएटर एडविना कायतो यांनी दिली.