Bathroom Cleaning Tips : बाथरूममध्ये घसरून पडण्याचा अनुभव अनेक लोकांना आलेला असतो. अनेकदा तर अनेक गंभीर घटना घडतात. अनेकांचा गंभीर इजा होऊन यात जीवही जातो. अशात सुरक्षित राहण्यासाठी बाथरूम स्वच्छ आणि कोरडं ठेवणं फार गरजेचं असतं.
सामान्य सगळेच लोक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाथरूम स्वच्छ करतात. पण तरीही कुठेना कुठे चिकटपणा आणि घाण तशीच राहते. अशात आज तुम्हाला बाथरूम स्वच्छ करण्याचे आणि फरशीवरील चिकटपणा दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत.
बाथरूमच्या टाईल्सवर चिकटपणाचं कारण...
बाथरूममध्ये टाईल असो वा नसो जर आंघोळ केल्यावर लगेच तिथे पाणी टाकून स्वच्छ करत नसाल तर टाईल्स किंवा फरशीवर चिकट डाग तयार होतात. याला कारण साबण, शाम्पू, लीकेज, टाईल्सवरील फंगस आहेत.
लिंबाचा करा वापर
जर तुम्हाला बाथरूममधील चिकटपणा दूर करायचा असेल आणि घरगुती उपायांचा शोध घेत असला तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. लिंबाच्या वापराने तुम्हाला खूप फायदा मिळेल. सोबतच बॅक्टेरिया देखील नष्ट होतील.
हा उपाय करण्यासाठी २ चमचे लिंबाचा रस २ कप गरम पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये टाका. हे पाणी बाथरूममध्ये सगळीकडे स्प्रे करा. १० मिनिटे ते तसंच राहू द्या. नंतर कापड किंवा स्क्रबने टाईल्स घासा आणि नंतर पाण्याने धुवा. काही वेळात सगळा चिकटपणा आणि डाग दूर होतील.
बेकिंग सोडा
बाथरूममधील टाईल्स किंवा फरशी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा एक बेस्ट उपाय आहे. एका वाट्यामध्ये अर्धा कप बेकिंग सोडा आणि एक चतुर्थांश हायड्रोजन पॅरॉक्साईड किंवा लिबांचा रस टाकून पेस्ट तयार करा. नंतर स्क्रबच्या मदतीने ही पेस्ट टाईल्सवर सगळीकडे लावा. १० ते २५ मिनिटे ती तशीच ठेवा. नंतर ब्रशने टाईल्स घासा. याने टाईल्सवरील चिकटपणा आणि डाग दूर होतील.
गरम आणि डिटर्जंट
जर तुमच्या बाथरूमच्या टाईल्सवर फार जास्त चिकटपणा असेल, तर आठवड्यातून १ ते २ वेळा गरम पाण्यात डिटर्जंट किंवा डिश वॉश टाकून टाईल्स स्वच्छ करा.यासाठी एक बकेटीमध्ये गरम पाण्यात सर्फ किंवा भांडी घासण्याचं लिक्विड चांगलं मिक्स करून २ ते ३ मिनिटांसाठी टाईल्सवर टाकून ठेवा. त्यानंतर ब्रशने टाईल्स घासून पाणी टाका.