Switch board cleaning tips : बऱ्याच लोकांना नेहमीच घराची साफ सफाई करणं आवडत असतं. लोक घरातील एक एक वस्तू स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. फॅन, लाईट, टेबल, टीव्ही, पॉट्स, आरसे सगळे स्वच्छ केले जातात. पण अनेकदा घरातील स्विच बोर्ड स्वच्छ करण्याकडे फारचं कुणी लक्ष देत नाहीत. अशात जास्त दिवस स्विच बोर्ड स्वच्छ न केल्याने त्यावर खूप धूळ-माती बसते आणि ते काळे दिसू लागतात.
स्विच बोर्डवर धूळ-माती इतकी घट्ट चिकटून जाते की, ती काढण्यासाठी खूप वेळ लागतो. अनेकांना हे स्विच बोर्ड कसे स्वच्छ करावे, त्यावरील घाण कशी काढावी हे माहीतच नसतं. आज अशा लोकांना आम्ही काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील स्विच बोर्ड चमकवू शकता.
टूथपेस्टने करा स्वच्छ
स्विच बोर्ड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता. एका भांड्यात ३ ते ४ चमचे नॉर्मल टूथपेस्ट घ्या आणि त्यात २ चमचे बेकिंग सोडा, काही पाण्याचे थेंब टाकून चांगलं मिक्स करा. ही पेस्ट स्विच बोर्डवर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर टूथ टूथब्रश किंवा क्लीनिंग ब्रशने स्विच बोर्ड स्वच्छ करा. नंतर एका कापडाने पुसून घ्या.
नेलपेंट रिमूवर
नेलपेंट रिमूवर स्विच बोर्डवरील काळे डाग काढण्यासाठी बेस्ट उपाय आहे. हे लिक्विड कापसाच्या बोळ्याला लावून स्विच बोर्ड साफ करू शकता. एकदा वापरूनच तुम्हाला स्विच बोर्ड साफ दिसेल. दुसऱ्यांदा स्वच्छ कराल तर स्विच बोर्ड क्लिन होईल.
बेकिंग सोडा
काळं झालेलं स्विच बोर्ड चमकदार करण्यासाठी बेकिंग सोडाही वापरू शकता. एक कप पाण्यात बेकिंग सोडा टाका. यात थोडा लिंबाचा रसही टाका. मग एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने स्विच बोर्डवर हे पाणी लावा. पाच मिनिटांनंतर त्याच ब्रश बोर्ड घासा. नंतर कापडाने स्विच बोर्ड पुसून घ्या.
लिंबू आणि काळं मीठ
लिंबू आणि काळ्या मिठाने स्विच बोर्डची चांगली सफाई होऊ शकते. यासाठी लिंबाचे दोन भाग करा. ते काळ्यात मिठात डिप करा. नंतर स्विच बोर्डवर घासा. त्यानंतर २ मिनिटांसाठी ते तसंच राहू द्या. त्यानंतर एका ब्रशने बोर्ड साफ करा. नंतर एका कापडाने बोर्ड पुसून घ्या.
काय घ्याल काळजी
घरातील स्विच बोर्ड स्वच्छ करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. क्लीनिंगआधी घरातील मेन स्विच ऑफ करा. घरातील इतरांनीही मेन स्विच ऑफ असल्याचं सांगा. जर चुकूनही स्विच बोर्डमध्ये किंवा बटनांमध्ये पाणी गेलं तर शॉक लागू शकतो. स्विच बोर्ड साफ करताना पायाच चप्पल घाला.