असे म्हणतात की अन्न 32 वेळा चावून खावे, म्हणजे ते पचते. ही बाब प्राण्यांनाही लागू होते का, प्रत्येक प्राण्यासाठी हा नियम वेगवेगळा आहे. पक्ष्याला दात नसतात मग तो चावून कसे खाणार. मगर, अजगरासारखे अनेक प्राणी देखील खाद्य अख्खेच्या अख्खे गिळतात. तसेच पक्षी देखील करतात. बगळा त्याला अपवाद नाही. बगळ्यांचे आवडते खाद्य हे मासा. एका फोटोग्राफरने मासा गिळल्यानंतर बगळ्याची झालेली भयावह अवस्था कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे.
#TiredEarth यामध्ये हा बगळा इल मासा गिळतो. परंतू हा मासा त्या बगळ्याचा गळाच फाडून बाहेर लटकताना दिसत आहे. @RebeccaH2030 ने हे फोटो टि्वटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हा बगळा कसा तो ईल मासा गळ्यातून बाहेर आला तरी उडत आहे, वावरत आहे. हा मासा त्या बगळ्याच्या गळ्यात साप लटकल्यासारखा दिसत आहे. Engineer Sam Davis नावाच्या व्यक्तीने हे फोटो काढले आहेत. हे फोटो अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये काढण्यात आले आहेत.
द सननुसार हा प्रकार त्या फोटोग्राफरला देखील माहिती नव्हता. त्याने काहीतरी बगळ्याच्या गळ्यात लटकतेय या नजरेतून फोटो काढले होते. जेव्हा त्याने घरी येऊन फोटो एडिट करण्यास घेतले तेव्हा त्याला काहीतरी वेगळे जाणवले. तो मासा त्या बगळ्याच्या मानेतून जिवंत बाहेर आला होता. हे पाहून त्याचे डोळे विस्फारले होते. एका अभ्यासात हा इल मासा शिकाऱ्याचे पोट फाडूनदेखील बाहेर येऊ शकते, असे समोर आले होते.