वीजबिल भरत नाही ? घरातून टीव्ही, कुलर, फ्रीजच नेला उचलून आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 08:26 PM2022-11-21T20:26:55+5:302022-11-21T20:28:30+5:30
वीजबिल भरले नाही तर त्यावर फाईन लागतो, पुढच्या महिन्यात जास्तीचे बिल द्यावे लागते किंवा कनेक्शन कट केले जाते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र मध्य प्रदेशात वेगळीच घटना घडली.
वीजबिल थकवणे हे प्रत्येक शहरात कॉमनच आहे. अनेक जण मुदत संपलेली असतानाही बील भरत नाही. वीजबिल भरले नाही तर त्यावर फाईन लागतो, पुढच्या महिन्यात जास्तीचे बिल द्यावे लागते किंवा कनेक्शन कट केले जाते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र मध्य प्रदेशात वेगळीच घटना घडली. इथे बील भरले नाही म्हणून वीज कंपनी लोकांच्या घरी येऊन टीव्ही, फ्रीज सारख्या वस्तु उचलुन घेऊन जात आहे. मध्य प्रदेशातील एमपी इलेक्ट्रिसिटी कंपनीने ग्राहकांकडून बिल वसून करण्याचा असा अनोखा उपाय काढला आहे. हा उपाय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैन मधील हा प्रकार आहे. एमपी इलेक्ट्रिसिटी कंपनी लोकांच्या घरी जाऊन फ्रीज,कुलर, हीटर एसी यांसारख्या वस्तु उचलुन घेऊन जात आहे. हे विकुन त्यातुन मिळणाऱ्या पैशांमधुन बिलाची रक्कम घेतली जात आहे.
कंपनीने दिले स्पष्टीकरण
या कंपनीकडुन सांगण्यात आले की,येथील लोक वर्षभर वीजेचा वापर करतात. मात्र जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा ते भरत नाही. अनेक लोकांनी ४० हजार ते ९० हजार रुपये थकवले आहेत. यामुळेच कंपनीने हे पाऊल उचलले. ज्या घरातुन सामान जप्त केले त्या नोकांनी २ वर्षांपासून बिलच भरलेले नाही. जवळपास २०० लोकांकडुन तब्बल दिड कोटी रुपये यायचे बाकी आहेत. नोटीस दिल्यानंतर यातील ७० लोकांनी बिल भरले आहे.