शहरं
Join us  
Trending Stories
1
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
2
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
3
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
4
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
5
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
6
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
7
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
8
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
9
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
10
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
11
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
12
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
13
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
14
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
15
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
16
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
17
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
18
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
19
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
20
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

Viral Video: हत्तीने म्हशीला रागाने जमिनीवर आदळले, झाला भयानक शेवट, व्हिडिओ पाहुन डोळे पाणावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 3:16 PM

हत्ती-म्हशीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हत्तीने म्हशीवर खतरनाक हल्ला केला आहे. हत्तीच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यूही झाला आहे,

काही दिवसांपूर्वी हत्ती आणि म्हशीचा  (Elephant Vs Buffalo) एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एक हत्ती मुद्दामहून म्हशीशी पंगा घेतो. त्यामुळे म्हैसही चवताळते आणि हत्तीवर हल्ला करते (Elephant Buffalo Video). पण या हल्ल्यात दोघांचाही एकमेकांना हानी पोहोचवण्याचा उद्देश नव्हता. आता अगदी याच्या उलट असा हत्ती-म्हशीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हत्तीने म्हशीवर खतरनाक हल्ला केला आहे. हत्तीच्या हल्ल्यात म्हशीचा मृत्यूही झाला आहे (Elephant attack on Buffalo).

हत्ती सर्वात अवाढव्य प्राणी. पण शरीराने तो जितका मोठा तितकाच तो शांत स्वभावाचा. पण जर तो चवताळला तर मग काही खरं नाही. त्यांच्यासमोर सिंह, वाघ, बिबट्या अशा प्राण्यांचंही काही चालत नाही. संतप्त हत्तींचे असे काही व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अशाच हत्तीचा हा व्हिडीओ आहे. ज्यात हत्तीने रागात एका म्हशीचा जीव घेतला आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक म्हैस एकटीच एका ठिकाणी शांत, आरामात बसलेली दिसते आहे. जणू ती थकली आहे आणि आरामासाठी थांबली आहे, असंच दिसून येतं. त्याचवेळी तिच्यासमोरून एक हत्ती येतो. हत्तीला येताना पाहताच म्हैस थोडी सावध होती. हत्ती चवताळलेला आहे हे तिच्या लक्षात येतं. आता हा हत्ती आपल्यावर हल्ला करणार हे तिला समजतं. त्यामुळे हत्ती आपल्याजवळ येऊन आपल्यावर हल्ला करण्याआधी इथून गेलेलंच बरं असा विचार करून ती हत्ती तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच तिथून पळते.

पण म्हशीला फार वेगाने पळणं काही जमत नाही. ती हत्तीपासून दूर जाण्याआधी हत्ती तिच्या जवळ येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. आधी आपल्या सोंडेने धक्का देत तिला जमिनीवर पाडतो. त्यानंतर तिला आपल्या सोंडेत धरतो आणि जमिनीवर आपटत राहतो. म्हशीला त्याच्या तावडीतून सुटणं शक्यच होत नाही. व्हिडीओच्या शेवटी म्हैस एकाच ठिकाणी शांत पडलेली दिसते. तिच्या शरीराची हालचालच होत नाही.

हत्तीने इतका भयंकर हल्ला केला आहे की म्हशीचा जागीच जीव गेला. तरी हत्ती तिला आपल्या सोंडेने दाबत राहतो. तिचा मृत्यू झाला आहे की नाही, हे निश्चित करतो. तिच्यात जीव नाही याची खात्री झाल्यानंतरच तो शांत होतो आणि तिथून निघून जातो. @Naji_alt नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर