हा व्हिडीओ IFS अधिकारी सुप्रिया साहू यांनी २५ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला. त्यांनी सांगितलं की, ही घटना नीलगिरीची आहे. इथे एका हत्तीने बसला टक्कर दिली. तर सुद्धा बस ड्रायव्हरने स्वत:ला शांत ठेवत परिस्थिती हॅंडल केली. तसेच प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यातही मदत केली. या बस ड्रायव्हरचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला ११ हजारांपर्यंत व्ह्यूज मिळाले आहेत.
सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वत:वर कंट्रोल ठेवला. हत्तीने तर बसची काचही फोडली. आज सकाळच्या या घटनेत त्याने प्रवाशांना सुरक्षित राहण्यास मदत केली. म्हणूनच म्हणतात की, शांत डोकं कमाल करतं.
१ मिनिटांच्या या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, हत्तीला रस्त्यावर पाहून ड्रायव्हर बस लगेच मागे घेतो आणि एका जागी उभी करतो. पण हत्ती त्यांच्या मागे येतो आणि हत्ती रागात बसची विंडशील्डवर जोरदार टक्कर मारतो. याने बसची काच फुटते. अशात बसमधील प्रवाशी घाबरतात. मात्र, बस ड्रायव्हर समजदारीने काम घेतो आणि आपली जागा सोडून मागे जातो. जेणेकरून हत्ती शांत होऊन जाईल.