Elephant Dance Video: सोशल मीडियावर नेहमीच हत्तींचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हत्तींच्या रेस्क्यूचा व्हिडीओ व्हायरल होतो तर हत्तीण तिच्या पिल्लाचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर भरतनाट्यमच्या संगीतावर थिरकणाऱ्या एका हत्तीचा व्हिडीओ लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या क्लिपमध्ये दोन तरूणी भरतनाट्यम करताना दिसत आहेत. त्या डान्सला सुरूवात करतात तेव्हा मागे उभा असलेला विशाल हत्ती सुद्धा डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'दोन तरूणी भरतनाट्यम करत आहेत. तेव्हाच अचानक एक हत्तीही त्यांच्या त्यांच्या तालाशी ताल मिळवत थिरकताना दिसत आहे'.
लोकांना डान्स करणाऱ्या हत्तीचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. लोक हत्तीचं भरभरून कौतुक करत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ३५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'मेरी प्यारी'.