सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून हत्तीचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये हत्तीची हेअरस्टाईल पाहण्यासारखी आहे. तामिळनाडूतील या हत्तीच्या हेअर स्टाईलचा भन्नाट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेनगामालम हा हत्ती मन्नारगुडी शहरातील राजगोपालस्वामी मंदिरात राहतो. या हत्तीचे खास शैलीत कापलेले केस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. हा फोटो इंडीयन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामन यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
Mannai Online ने दिलेल्या माहितीनुसार २००३ मध्ये या हत्तीला राजगोपलस्वामी मंदिरात आणण्यात आलं होतं. त्यानंतर एस महावत यांनी या हत्तीची हेअरस्टाईल केल्यानंतर हटके लुक्समुळे हा हत्ती खूपच प्रसिद्ध झाला आहे. या ह्त्तीची देखभाल सुद्धा करावी लागते. इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुधा रामन यांनी फोटो शेअर केल्याने नेटकरी या हत्तीच्या फोटोचं खूप कौतुक करत आहेत.
शेअर केल्यानंतर काही मिनिटातच या फोटोला १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. महावत राजगोपाल यांनी माध्यमांना सांगितले की, ''मी या हत्तीची देखभाल स्वतःच्या मुलाप्रमाणे करतो. मला आधीपासूनच या हत्तीला खास लुक द्यायचा होता. एकदा मी इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिला होता. त्यातील हत्तीचा बॉब कट मला खूप आवडला त्यानंतर मी सेनगामलमचे केस अशा स्टाईलने कापण्याचा विचार केला. पण हत्ती जेव्हा स्थिर राहतो तेव्हाच केस कापणं शक्य असते. अन्यथा हे खूप कठीण काम आहे.
बॉब-कट सेनगामलम च्या आगळ्या वेगळ्या लुकला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दर्शवली आहे. लोकांनी या व्हिडीयोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हत्तीच्या डोक्यावरील केस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?
केवळ सनी लिओनीच नाही तर 'या' 10 पॉर्न स्टार्सही आहेत विवाहित, कशी आहे त्यांची फॅमिली?