सामान्यपणे हत्ती हे जंगलात बघायला मिळतात किंवा मग सर्कसमध्ये. हत्तीचं भव्य रूप पाहून लोक अवाक् होतात. तसे तर हत्ती शांत असतात, पण एकदा का त्यांना राग आला तर मग काय होईल काही सांगता येत नाही. भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जंगलांच्या मधून रस्ते बनवले आहेत आणि या रस्त्यावरून जंगलातील प्राणी पास होतात. अशात जेव्हा प्राणी रस्त्यावर असतात तेव्हा मनुष्यांना काळजी घ्यावी लागते. असंच काहीसं सोशल मीडियावर व्हायरल (Elephant Viral Video) झालेल्या एका व्हिडीओत बघायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एक बाइकस्वार आपल्यासोबत एका व्यक्तीला घेऊन रस्त्याने जात असतो. पण तेव्हाच समोरून एक विशाल हत्ती येतो.
त्याला बघू बाइकवरील लोकांना अंदाज आला आहे की, हत्ती त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्यांच्या बाजूने येत आहे. काही सेकंदात संतापलेला हत्ती धावत त्या लोकांकडे येऊ लागतो. अशात बाइकवरील दोघेही आपली गाडी तिथेच सोडून धावायला लागतात. दोघेही इतक्या वेगाने पळून जातात की, बघून हसू येऊ लागतं. काही वेळाने हत्ती थांबतो. पण ते दोघे पळतच राहतात.
अर्थातच हत्ती थांबला तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला असेल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तूफान व्हायरल झालाय. @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून अनेकांनी रिट्विट केला आहे. तसेच २ लाख ७५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.