Elephant Viral Video : सोशल मीडियावर हत्तींचे कितीतरी मजेदार व्हिडीओ शेअर केले जातात. हे व्हिडीओ लोकांना खूपच आवडतात. हे व्हिडीओ बघून लोकांचा मूड चांगला होतो आणि चेहऱ्यावर हसूही येतं. पण आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो बघून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल.
व्हिडीओच्या सुरूवातीलाच तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभा आहे. काही सेकंदानी तिथे मागून एक हत्ती येतो, हा हत्ती त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे जात आहे. हत्ती व्यक्तीच्या मागे येऊ थांबतो आणि पायाने माती व्यक्तीकडे फेकतो, जेणेकरून त्याला जाण्यासाठी रस्ता मिळेल. अचानक मागे हत्ती दिसल्याने व्यक्ती घाबरून पळतो आणि एका बाजूला जाऊ उभा राहतो.
या मजेदार आणि हत्तीची समजदारी दाखवणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत 31 हजारांपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. लोक हत्तीचं हे वागणं पाहून थक्क झाले. तेच काही लोकांना विश्वास बसत नाहीये की, हत्ती इतका समजदार आणि शांतपणेही वागतो.