Elephant Viral Video : दक्षिण आफ्रिकेच्या एडो एलीफंट नॅशनल पार्कमध्ये एक हत्तीचं पिल्लू तलावात पडलं होतं. त्याला वाचवण्यासाठी हत्तींचा कळप एकत्र आला. मनाला भिडणारी ही पूर्ण घटना जोलॅंडी डी क्लर्क ने कॅमेरात कैद केली. ती तिच्या हनीमूनसाठी पार्कमध्ये गेली होती. हा व्हिडीओ लेटेस्ट साइटिंग्स द्वारे यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत.
ही घटना तेव्हा घडली जेव्हा पत्तीचं एक पिल्लू आपल्या परिवारासोबत एका तलावातून पाणी पिण्याचा प्रयत्न करत होतं आणि घसरून तलावात पडलं. हे बघून आजूबाजूला असलेले सगळे हत्ती जमा झाले आणि पिल्ल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. अनेकदा प्रयत्न करूनही पिल्लू चिखलात घसरून पडत होतं.
स्थिती गंभीर होत असल्याचं पाहून वयस्क हत्तींपैकी एकाने आयडिया केली आणि तो पाण्यात उरण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर लगेच एक दुसरा हत्ती मदतीला आला. त्यांनी नाजूकपणे थकलेल्या पिल्ल्याला बाहेर खेचू लागले.
या घटनेबाबत सांगत डी क्लार्कने कॅप्शनला लिहिलं की, 'जेव्हा एक हत्ती पाण्यात उतरला तर दुसराही त्याच्या मागे गेला आणि दोन मोठ्या हत्तींनी हळूहळू त्याला पिल्ल्याचा खेचलं. यामुळे त्याला बाहेर काढणं सोपं झालं. जसं पिल्लू बाहेर आलं सगळ्यांना बरं वाटलं'.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओ अनेक कमेंट्सही करत आहेत. सगळ्यांनी मिळून पिल्ल्याला कसं बाहेर काढलं याचं सगळेजण कौतुक करत आहेत. तसेच काहींनी कमेंट केल्या की, यातून मनुष्यांनी काहीतरी शिकलं पाहिजे.