टेस्लाचे सीईओ आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव असतात. जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉपवर येणाऱ्या एलन मस्क यांचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. शनिवारी ३ एप्रिल त्यांनी एक सहा चाकांची गोल्ड कारचा फोटो शेअर केला होता. याच्या कॅप्शनला एलन मस्कने लिहिले होते की, 'मी माझ्या सिक न्यू कारमध्ये'. या कारच्या फोटोने त्यांच्या फॅन्सना हैराण केलं आहे. या ट्विटवर हजारो लोक मजेदार कमेंट करत आहेत.
या ६ चाकांच्या गोल्डन कारवर शानदार आर्टवर्क दिसत आहे. सोबतच यात तुम्ही एका व्यक्ती काउबॉय हॅट घालून बसलेलं बघू शकता. आतापर्यंत एलन मस्कच्या या ट्विटला २ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स, १२ हजार रीट्विट आणि ६० हजारांपेक्षा जास्त कमेंट मिळाल्या आहेत. अनेकांना हे जाणून घ्यायचं आहे की, त्यांनी नवीन कार का खरेदी केली. तर अनेकजण कन्फ्यूज आहे की, त्यांनी ही कार खरेदी केली नाही.
एलन मस्कने २००४ मध्ये इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची स्थापना केली आणि ते म्हणाले की 'फ्यूचरमध्ये सगळंकाही इलेक्ट्रिक असेल. स्पेसमध्ये जाणारे रॉकेटही. आणि हा बदल आणण्यासाठी टेस्ला महत्वाची भूमिका बजावणार'.
या नव्या कारचं रहस्य तेव्हा उलगडलं जेव्हा सायबरपंक २०७७ नावाच्या एका व्हिडीओ गेमच्या स्क्रीनशॉटच्या रूपात हा फोटो ओळखला. सायबरपंक २०७७ CD Projekt द्वारे तयार करण्यात आलेा एक अॅक्शन पार्ट प्लेइंग व्हिडीओ गेम आहे. एलन मस्कचं या गेमवरील प्रेम जगजाहीर आहे. २०२१ च्या सुरूवातीला ते म्हणाले होते की, टेस्ला मॉडल S मध्ये गेमिंग लॅपटॉपवर व्हिडीओ गेम खेळला जाऊ शकतो.