प्रायव्हेट कंपन्यांमधील 'टार्गेट'चं टेन्शन काय असतं हे त्या कर्मचाऱ्यांनाच चांगलं माहीत. जगात काहीही झालं तरी टार्गेट काही कमी होत नाहीत. नोकरी करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात टारगेट हा शनीसारखाच असतो. तो कधी कमी होत नाही, सतत वाढत असतो. टार्गेट पूर्ण न झाल्यास काय होतं? हे त्या कर्मचाऱ्यांना चांगलंच माहीत असतं. तुम्ही टार्गेट पूर्ण केल्यास नोकरी गेल्याचं किंवा ओरडा पडल्याचं ऐकलं असेलच. पण चीनच्या एक कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत जे केलं त्याला विचारही केला जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात बघायला मिळतंय की, चीनमधील एका कंपनीने टारगेच पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत काय केलं.
या वायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही लोक एका रस्त्यावर गुडघ्यावर चालत आहेत. त्यांच्यासमोर एक व्यक्ती झेंडा घेऊन चालतोय. सर्वच लोक हे सूटबूटात आहेत. हा व्हिडीओ SCMP ने ट्विटर पोस्ट केला आहे. ही पहिलीच वेळ नाहीये की, अशाप्रकारे चीनमध्ये एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना शिक्षा दिली असेल. गेल्यावर्षीही अशी घटना घडली आहे.
सकाळी कर्मचारी ऑफिसला पोहोचल्यावर त्यांना कळाले की, टार्गेट पूर्ण न केल्याने त्यांना शिक्षा मिळणार आहे. काय शिक्षा मिळणार हे कळाल्यावर त्यांना धक्काच बसला. रस्त्यावर ते गुडघ्यावर चालायला लागले. पण काही वेळाने पोलिसांनी हस्तक्षेप करुन हे सगळं थांबवलं. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेनंतर ही कंपनी अस्थायी रुपाने बंद करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियातून या कंपनीवर जोरदार टिकाही केली गेली. पण कर्मचाऱ्यांवरही काही लोकांनी टिका केली. कर्मचाऱ्यांनी तरी असं का केलं? असा प्रश्न त्यांना विचारला गेला.