आजच्या काळात शिक्षित असूनही लोकांना नोकऱ्या मिळण्यात खूप अडचणी येत आहेत. असंच काहीसं या व्यक्तीसोबत घडलंय. त्याच्याकडे अभियांत्रिकीची पदवी आहे, पण दोन वेळच्या जेवणासाठी आपलं पोट भरण्यासाठी तो स्विगीमध्ये काम करत होता. पण आता इंटरनेटनं त्याचं नशीब आता पालटलंय. साहिल सिंग नावाच्या या व्यक्तीने इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. जेवण त्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला ३ किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. तो स्विगी एजंट म्हणून काम करत होता. त्याची ही कहाणी सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
एका टेक कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या लिंक्डइन युजर प्रियांशी चंदेलनं साहिलला मोठी मदत केली. साहिल तिच्या घरी आईस्क्रीम देण्यासाठी आला होता. तो ३०-४० मिनिटे उशिरा आला. तिनं साहिलला उशीर होण्याचं कारण विचारलं. त्यावेळी त्यानं आपल्याकडे कोणतंही वाहन नाही, त्यामुळे घरापर्यंत येण्यासाठी ३ किमी चालत यावं लागल्याचं त्यानं सांगितलं. बोलताना त्यानं आपल्याकडे इलेक्ट्रिकल आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी असल्याचं सांगत यापूर्वी आपण बायजूस आणि निंजाकार्टमध्ये काम केल्याचंही तो म्हणाला. पण कोरोना महासाथीत नोकरी गमावल्यानंतर त्याला आपल्या जम्मूतील घरी परतावं लागलं.
"मॅम माझ्याकडे जाण्यायेण्यासाठी स्कूटी किंवा दुसरं कोणतंही वान नाही. तुमच्या ऑर्डरसाठी मी ३ किलोमीटर चालत आलोय. माझ्याकडे बिलकूल पैसे नाहीत आणि हे माझ्या फ्लॅटमेटमुळे झालंय. त्यानं माझे उरलेले पैसे घेतले. त्यातून मी माझी युलू बाईक चार्ज केली असती. मला २३५ रुपयांच्या कर्जात टाकलं. घर मालकालाही देण्यासाठी माझ्याकडे काही. मी असंच काही बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल. पण मी शिक्षित आहे. ईसीई ग्रेड आहे. कोरोना काळात जन्मूला माझ्या घरी जाण्यापूर्वी मी निंजाकार्ट आणि बायजूसमध्ये नोकरी करत होतो," असं साहिलनं प्रियांशीला सांगितलं.
"या ऑर्डरच्या डिलिव्हरीसाठी मला २०-२५ रुपये मिळेतील. १२ वाजण्यापूर्वी मला दुसरी डिलिव्हरी घ्यावी लागेल, नाहीतर मला दूर जावं लागेल. माझ्याकडे बाईक नाही, आठवडाभर जेवणंही केलं नाही. केवळ पाणी आणि चहा पिऊन दिवस काढतोय. मी काही मागत नाही, फक्त माझ्यासाठी काही काम शोधता आलं तर पाहा. पहिले मी २५ हजार कमवत होती. आई वडिलांचंही वय होत आलंय आणि मी त्यांच्याकडे पैसे मागू शकत नाही," असंही तो म्हणाला.
मिळाली नवी नोकरीयानंतर प्रियांशीनं साहिलच्या ईमेलसोबत त्याची मार्कशीट आणि सर्टिफिकेट लिंक्डिनवर शेअर केली. कोणाकडे अॅडमिन बॉय, अॅडमिन वर्क, कस्टमर सपोर्टसारख्या कामासाठी नोकरी असले तर याची मदत करा असं तिनं म्हटलं. यानंतर अनेक लोक पुढे आले. काही लोकांनी त्याची युलू बाईकही रिचार्ज केली. तर काहींनी खाण्याची ऑर्डरही दिली. यानंतर प्रियांशीनं साहिलला नोकरी मिळाल्याचंही सांगितलं. "त्याला नोकरी मिळाली आहे. जे लोक मदतीसाठी पुढे आले त्यांची मनापासून आभार, तुम्ही सगळेच कमाल आहात," असं तिनं म्हटलं