Viral Video : सोशल मीडिया हे कलागुणांना वाव देणारं एक व्यासपीठ आहे. या माध्यमातून नेटकऱ्यांचं मनोरंजन होतंच, शिवाय वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्यांना ज्ञात होते. फोटो, व्हिडीओजच्या साहय्याने या आधुनिक दुनियेत प्रत्येकाचा अपडेट राहण्याचा अट्टहास असतो.
आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं नक्कीच ऐकलं असेलच. त्यावेळी मुलांना चॉकलेटच्या बंगल्याने भूरळ घातली. या उलट सध्या सोशल मीडियावर एका व्हायरल होणाऱ्या काचेच्या बंगल्याने जगभरातील इंजिनिअर्सना भूरळ घातलेय.
सध्या सोशल मीडियावर एका इंजिनिअरच्या अनोख्या कारागिरीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. टाकाऊ असणाऱ्या काचेच्या बाटल्यांचा उपयोग करत या इंजिनिअरने चक्क घराचे बांधकाम केले आहे. विटा, सिमेंटसोबतच त्याने एकावर एक बाटल्यांचा थर रचत अख्ख घर उभं केलंय. त्याच्या या कौशल्याचे नेटकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. घरातील सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या या बाटल्यांचा असाही वापर केला जाऊ शकतो हे पाहून लोक अवाक् झाले आहेत.
ही यूनिक आयडिया पाहून जगभरातील इंजिनिअर विचारात पडले आहेत. या इंजिनिअरची भन्नाट शक्कल नेटकऱ्यांना तुफान आवडली आहे. दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर काही यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. सिमेंट क्रॉंक्रिटीकरणाच्या करणाच्या आजच्या युगात या इंजिनिअरची ही कल्पना उपयोगी पडणारी आहे.
पाहा व्हिडीओ -