शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

प्रसिद्ध कंपनीने लॉन्च केली भाजीसारखी दिसणारी बॅग, किंमत इतकी की घेऊ शकाल लक्झरी कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 1:29 PM

Moschino Celery Bag: डिझाईन तर अजब आहेच, पण या बॅगच्या किंमतीने लोकांची झोप उडाली आहे. कारण या बॅगच्या किंमतीत तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता.

Moschino Celery Bag: प्रसिद्ध फॅशन ब्रॅन्ड मोशिनो या वर्षाच्या सुरूवातीलाच एक अनोख्या डिझाईनची बॅग लॉन्च केली होती. ही बॅग ब्रेडसारखी दिसत होती. आता या ब्रॅन्डने पुन्हा एक अजब डिझाईनची बॅग लॉन्च केली आहे. जी सेलेरी भाजीसारखी दिसते. डिझाईन तर अजब आहेच, पण या बॅगच्या किंमतीने लोकांची झोप उडाली आहे. कारण या बॅगच्या किंमतीत तुम्ही एक लक्झरी कार खरेदी करू शकता.

सोशल मीडियावर सध्या या ब्रॅन्डच्या नव्या बॅगची चर्चा रंगली आहे. ही बॅग तयार करण्यासाठी दोन रंगाच्या शेड्सच्या लेदरचा वापर करण्यात आला आहे. काही लोक या बॅगला पसंती देत आहेत तर काही लोक ही बॅग बघून हैराण झाले आहेत.

फॅशनच्या विश्वात रोज काहीतरी नवीन होत असतं. पण यावेळी मोस्किनोने सगळ्यांनाच अवाक् केलं. यावेळी त्यांनी एक अशी बॅग लॉन्च केली जी एखाद्या भाजीसारखी किंवा एखाद्या रोपासारखी दिसते. त्याहून महत्वाची बाब म्हणजे या बॅगची किंमत $4,470 म्हणजेच जवळपास ४ लाख रूपये ठेवली आहे. 

मोस्किनोने ही बॅग क्लचच्या रूपात सादर केली आहे आणि दोन हिरव्या रंगात तयार केली आहे. बॅगमधील पाने आणि फांद्या नप्पा लेदरपासून तयार केले आहेत. सोशल मीडिया यूजर्स या बॅगबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिलं की, "आई : कोथिंबीर कुठे आहे? मी : कोथिंबिरीच्या बॅगमध्ये". मोस्किनो हा ब्रॅन्ड पहिल्यांदाच काय अशा अजब डिझाईनमुळे चर्चेत आला नाही. याआधी त्यांनी अनेक वस्तू अजब डिझाईनमध्ये सादर केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके