Wooden Chopping Board Cleaning Tips : किचनमध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो, मिरच्या किंवा इतरही काही गोष्टी कापण्यासाठी चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. प्लास्टिक चांगलं नसतं म्हणून बरेच लोक लाकडी चॉपिंग बोर्डचा वापर करतात. कारण प्लास्टिकवर चाकूमुळे रेषा तयार होतात आणि प्लास्टिकचे तुकडे पडू लागतात. जे आपल्या पोटातही जाऊ शकतात. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका असतो. याच कारणाने जास्तीत जास्त एक्सपर्ट लाकडी चॉपिंग बोर्ड वापरण्याचा सल्ला देतात. पण हेही वापरताना काय काळजी घ्यावी याच्या टिप्स किंवा लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्याच्या टिप्स शेफ नेहा दीपक शाह यांनी दिल्या आहेत.
लाकडी म्हणजेच वुडन चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी आणि डिसइन्फेक्ट करण्यासाठी शेफ नेहा यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, सगळ्यात आधी चॉपिंग बोर्डवर पाणी टाका. त्यानंतर त्यावर थोडं मीठ आणि बेकिंग सोडा टाकून अर्ध्या लिंबाचा रस टाका. लिंबाच्या सालीनेच चॉपिंग बोर्ड चांगलं स्वच्छ करा. त्यानंतर हलक्या गरम पाण्याने चॉपिंग बोर्ड स्वच्छ धुवा. चॉपिंग बोर्ड कोरडं झाल्यानंतर थोडं तेल टाकून टिसू पेपरने पसरवा. असं केल्याने चॉपिंग बोर्ड डिसइन्फेक्ट होईल आणि त्यावर बॅक्टेरिया राहणार नाहीत.
लाकडी चॉपिंग बोर्डमधून वास येण्याची समस्या होऊ शकते. हा वास इतर पदार्थांना लागून त्यांची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते. अशात चॉपिंग बोर्डची नियमितपणे स्वच्छता करणं गरजेचं असतं. लाकडी चॉपिंग बोर्ड हे प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डपेक्षा जास्त हायजेनिक असतात. कारण लाकडामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. तसेच लाकडी चॉपिंग बोर्ड हे प्लास्टिकच्या तुलनेत जास्त काळ टिकतात.