जगभरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नेहमीच आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. अशाच एका घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. जर तुम्हाला कुणी विचारलं की, तुम्ही कधी तीन डोळे असलेली गाय पाहिली का? तर कुणीली सहजपणे नाही असं उत्तर देतील. मात्र, इंग्लंडमध्ये एका गायीच्या एका अशा बछड्याने जन्म घेतलाय ज्याला दोन नाही तर तीन डोळे आहेत. या बछड्याचे दोन डोळे आपल्या ठिकाणी आहेत, तर तिसरा डोळा कपाळावर मध्यभागी आहे.
एका पशु चिकित्सकानुसार, हा अजब प्रकारे जन्माला आलेला बछडा पूर्णपणे फिट आहे. इतर बछड्यांप्रमाणेच आहे. पशु चिकित्सक मालन ह्यूजेस यांनी या अनोख्या बछड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. त्यानंतर याची सगळीकडे चर्चा रंगली. या बछड्याच्या कपाळावर तिसरा डोळा आहे. पण तो एकप्रकारे अविकसित दिसतो आहे. कारण पापण्या पूर्णपणे बंद आहेत. (हे पण बघा : lungi man : बाबो! आधी सापाला उचललं अन् मग लुंगीत सोडलं; नंतर घडलं असं काही......)
मालन ह्यूजेस म्हणाले की, हे समजून घेणं कठिण आहे की, त्याच्या तिसऱ्या डोळ्यामागे नेमकं सुरू काय आहे. महिलेनुसार, हे बछडं साधारण चार महिन्यांचं आहे आणि त्याला इतरही कोणतीही आरोग्यासंबंधी समस्या दिसून येत नाहीये. मालनने मान्य केलं की, त्याने आधी दोन डोकी असलेले प्राणी पाहिले आहेत. पण तीन डोळे असलेला प्राणी पहिल्यांदाच बघतो आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही हा वेगळा अनुभव आहे.
दरम्यान, याआधी भारतात तीन डोळ्याच्या बछड्याने जन्म घेतला आहे. भारतात या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती. कारण देशातील अनेक लोक या बछड्याला देवाचं रूप मानू लागले होते. मात्र, इंग्लंडसारख्या देशात अशाप्रकारच्या प्राण्यांना इतर प्राण्यांसारखंच समजलं जातं. पण जर भारतात अशाप्रकारे एखाद्या प्राण्याने जन्म घेतला तर त्याला देव समजून त्याची पूजा केली जाते.