कोरोनाकाळातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता दिवाळीसाठी फेसबुकने एक सात मिनिटांचा व्हिडीओ लॉन्च केला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोना व्हायरसच्या माहामारीत सोशल मीडियाची भूमिका तसंच बेरोजगारी यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. दिवाळीनिमित्ताने फेसबूकने ही शॉर्ट फिल्म लॉन्च केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पंजाबच्या अमृतसरची रहिवासी असलेली पूजा ही मुलगी पूजा मिल्क सेंटर (Pooja Milk Centre) चालवते. कोरोनाच्या माहामारीने लहान मोठ्या सगळ्याच उद्योग धंद्यांवर परिणाम झाला. त्यामुळे अनेक कंपन्यांनी पगार कपात केली तर कुठे नोकरकपात करण्यात आली. अशा प्रसंगी नोकरी गेलेल्या लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पूजाने प्रयत्न सुरू केले.
यात असं दाखवलं आहे की, फेसबूकच्या माध्यमातून पूजाने आवाहन केलं होतं की, ज्यांची नोकरी गेली आहे. त्यांनी मला संपर्क करा. लवकच कामगार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, डिलिव्हरीमॅन दुधाच्या क्रेंदावर एकत्र जमले. आपल्या भावाच्या विरोधात जाऊन पूजाने नोकरी गमावलेल्या लोकांना गरज नसतानाही नोकरीवर ठेवले. आपल्या मजूरांना पैसे देण्यासाठी पूजाने कारसुद्धा विकली यांची सुद्धा दिवाळी आहे. असं सांगत तिने मजूरांना नोकरीवरून काढण्यापासून तिच्या लहान भावाला रोखलं. मानलं गड्या! लॉकडाऊनमुळे पायलटची नोकरी गेली अन् आता युनिफॉर्मवरच विकताहेत नूडल्स
एक कर्मचारी या भावा-बहिणीचं संभाषण ऐकतो. मग सगळे कर्मचारी एकत्र मिळून मदत करण्याचा विचार करतात. त्यानंतर ते एक फेसबूक व्हिडीओ तयार करतात. त्या माध्यमातून लोकांना पूजा मिल्क सेंटरला भेट देण्याचे आवाहन केले जाते. त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही तुम्हालाही भरून येईल. आतापर्यंत २६ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या शॉर्ट फिल्मवर लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ खूपच उत्तमरित्या तयार केला असून मनाला भिडणारा आहे. या व्हिडियोला नेटिझन्सनी पसंती दिली आहे. माणूसकीला सलाम! दगडाखाली २ तास अडकलेल्या महिलेला गावकऱ्यांनी दिलं जीवदान; पाहा फोटो